Sunday, June 28

Tag: to the farmer’s loan waiver?

Harshvardhan Sapkal : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या, शेतकरी कर्जमाफीचे काय झाले? : हर्षवर्धन सपकाळ

Harshvardhan Sapkal : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या, शेतकरी कर्जमाफीचे काय झाले? : हर्षवर्धन सपकाळ

नांदेड, मुंबई, राजकीय
मुंबई| राज्यात यावर्षी सरसरीपेक्षा दुप्पट, तिप्पट पाऊस पडला आहे. ३६ जिल्हे व ३५८ तालुक्यापैकी ३० जिल्हे व जवळपास ३०० तालुके अतिवृष्टी आणि पूरग्रस्त आहेत. राज्यभरात जवळपास १४३ लाख हेक्टरवरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाऊस सातत्याने पडत असून शेतकरी हवालदिल झाला आहे परंतु राज्यातील महायुती सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही, पालकमंत्र्याने पाहणी सुद्धा केली नाही. मंत्रिमंडळ बैठकीत फक्त कोरडी चर्चा झाली. सरकारने झोपेतून जागे व्हावे व संकटातील शेतकऱ्याला हेक्टरी सरसकट ५० हजार रुपये तातडीने द्यावेत व शेतजमीन खरडून गेली त्यांना हेक्टरी ५ लाख रुपये द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. टिळक भवन येथील पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर चौफेर हल्ला केला. ते पुढे म्हणाले की, मुसळधार पावसामुळे ...
error: Content is protected !!