Municipal corporetion ; नवीन कौठा येथील दलित वस्तीतील पाणी प्रश्न सोडवून नागरी सुविधा द्याव्यात ; अन्यथा महापालिकेवर घागर मोर्चा – सुनील अनंतवार -NNL
नांदेड। मागील बारा वर्षांपासून नवीन कौठा येथील पाणी प्रश्न सोडविण्यात यावा व तेथे नागरी सुविधा पुरविण्यात याव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा व अनेक तक्रारी महापालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात येत आहेत. परंतु मागण्या पूर्ण होत नाहीत ही खुपच गंभीर बाब आहे.
महापालिका हद्दीत आपण आहोत का नाही? असा प्रश्न येथील नागरिकांना पडत आहे.अमृत योजनेसाठी आलेले करोडो रुपये व करापोटी वसुली झालेली रक्कम जाते कुठे असा प्रश्न नवीन कौठा येथील नागरिक विचारत आहेत.या भागात अजून नळ पोहचले नाहीत. कचरा व्यवस्थापन नाही,नाली नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचून घाणीचे साम्राज्य निर्माण होत असून साथीचे रोग पसरण्याची भीती आहे.
विशष म्हणजे ही परिस्थिती नवीन कौठा येथील दलित वस्ती मधील आहे.विष्णुपुरी जलाशय पूर्णता भरलेला असताना सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी वानवा आहे.पाणी प्रश्न तातडीने सोडवावा,पाण्यासाठी महिलांची होणा...
