Tuesday, May 19

Tag: To live a reading culture

Dr. Suresh Sawant : वाचन संस्कृती जगण्यासाठी मुलांना मोबाईलच्या नव्हे तर पुस्तकांच्या सानिध्यात न्या – डॉ.सुरेश सावंत

Dr. Suresh Sawant : वाचन संस्कृती जगण्यासाठी मुलांना मोबाईलच्या नव्हे तर पुस्तकांच्या सानिध्यात न्या – डॉ.सुरेश सावंत

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| पुस्तक वाचण्यातून माणूस समृद्ध होतो. ही वाचन संस्कृती आता जगण्यासाठी मुलांना मोबाईलच्या नावे तर पुस्तकांच्या सानिध्यात न्या असे आवाहन डॉ. सुरेश सावंत यांनी केले. पालक मोबाईलपासून दूर राहिले तर मुलेही मोबाईलपासून दूर होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुलांच्या मानसिक समृद्धतेसाठी चांगल्या बाल साहित्याचीही गरज आहे. आता ही गरज साहित्यिकांनी पूर्ण करावी असेही ते म्हणाले. नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ, डिजिटल मीडिया परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने साहित्य अकादमी पुरस्काराचे मानकरी डॉ. सुरेश सावंत आणि महाराष्ट्र शासनाच्या वृत्त छायाचित्रकार पुरस्काराचे मानकरी सचिन मोहिते यांचा नांदेडमध्ये शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी डॉ. सुरेश सावंत हे बोलत होते. या कार्यक्रमास म...
error: Content is protected !!