Chief Executive Officer Meenal Karanwal : एकंबातील विकास कामात झालेल्या अपहाराच्या चौकशीसाठी गावकरी मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या दालनात -NNL
नांदेड/हिमायतनगर,अनिल मादसवार। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या पैनगंगा नदीकाठावरील एकंबा ग्रामपंचायतीच्या अधिकारी पदाधिकारी यांनी येथील नळ योजनेची विहिर, फिल्टर पाणी मशिन, लहान मुलांचे साहित्य, गावातील अंतर्गत नाल्या व इतर विविध विकास कामांचे कोणतेही अंदाजपत्रक न करता परस्पर सरपंच, उपसरपच, ग्रामसेवक यानी अभियंत्याला हाताशी धरुन कागदोपत्री कामे केली आहेत. एव्हढेच नाहीतर कामे झाल्याचे दर्शवून शासनाचा निधी उचलून घेवुन हडप केल्याची तक्रार मुख्य कार्यकारी मीनल करणवाल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याची गावकऱ्यांसमक्ष चौकशी करून कारवाई करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा येथील ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामात झालेल्या अपहार व गैरव्यवहार बाबत दिलेल्या तक्रारीत म्हंटलं आहे की,नांदेड जिल्ह्य...
