Collector’s appeal : आपले भविष्य ठरविण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन -NNL
नांदेड जिल्ह्यामध्ये आजपासून आदर्श आचारसंहिता लागू
20 नोव्हेंबरला मतदान 23 नोव्हेंबरला निकाल लागणार
6 विधानसभा क्षेत्रात बोटाला एकदाच शाई मतदान मात्र विधानसभा व लोकसभेला
जिल्ह्यात 27 लक्ष 71 हजार एकूण मतदार
नऊ विधानसभा व एका लोकसभा पोट निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
सोशल मीडियावर प्रचार प्रसार केल्यास सक्त कारवाई
72 तासात सर्व होर्डिंग व शासकीय कार्यालयातील प्रचार साहित्य साफ करा
मतदान करणे हा सुखद अनुभव बनविण्याचे प्रशासनाचे लक्ष्य
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील नऊ मतदार संघात विधानसभेच्या निवडणुका 20 नोव्हेंबरला होत आहेत. तर नऊ पैकी सहा विधानसभा क्षेत्रांनी बनलेल्या 16- नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकही एकाच दिवशी 20 नोव्हेंबर रोजी होत आहे. या दोन्ही निवडणुकांमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकांपेक्षा अधिक संख्येने मतदान करण्याचे आवाहन आज जिल्हा प्रशासनाने केले. जिल्हाधिकारी...
