Thursday, May 14

Tag: to bring disabled people

दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज – देवसटवार – NNL

दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज – देवसटवार – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन लातूरच्या समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी केले आहे. शहरातील सामाजिक न्याय भवन येथे नुकतेच श्रवण शिक्षण महत्व या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत प्रादेशिक उपायुक्त देवसटवार बोलत होते, यावेळी जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आउलवार, दिनकर जोशी, डॉ. लक्ष्मीकांत बजाज, डॉ. क्षितीज निर्मल, तुकाराम धुमाळे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना देवसटवार म्हणाले की, सामान्यांप्रमाणेच दिव्यांग व्यक्तीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शालेय शिक्षण घेताना दिव्यांगांना विशेष उपचार विशेष शिक्षक व वाचा उपचार तज्ञ यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. दिव्यांग शाळेच्या कर्मचाऱ्यांनी वेतनापेक्षा आपण समाजाचे देणे आहोत, या भूमिकेतून कार्य करणे...
error: Content is protected !!