Chief Minister’s Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष गरजू रुग्णांसाठी ठरतोय वरदान
नांदेड| मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष पात्र व गरजु रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. 1 जानेवारी ते 30 जून 2025 या कालावधीत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातून नांदेड जिल्ह्यात 385 रुग्णांना 3 कोटी 31 लाखांची मदत देण्यात आली. दिवसेंदिवस मदतीमध्ये वाढ होत आहे. गरजू रुग्णांना वेळेत मदत मिळावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून जिल्हा स्तरावर कक्ष उपलब्ध झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे असे रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांनी सांगितले.
राज्यातील नागरिकांना दुर्धर आजारांवरील उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून आर्थिक सहाय्य देण्यात येते. तसेच आपत्ती प्रसंगीही आर्थिक मदत देण्यात येते. यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून मदत मिळविण्या...
