Friday, June 26

Tag: the Vice Presidential election

C.P. Radhakrishnan : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी

C.P. Radhakrishnan : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी

नांदेड, देश विदेश, मुंबई
नवी दिल्ली| महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी.पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीमध्ये विजयी झाले आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संसदेत मतदान झाले. एकूण ९८ टक्के मतदान झाले असून यामध्ये एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना एकूण 752 मतांपैकी पहिल्या पसंतीची 452 मते मिळाली आहेत तर इंडिया आघाडीचे उमेदवार आणि माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी 300 मते मिळाली आहेत. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक प्रक्रिया सकाळी 10 वाजता संसद भवनात सुरू झाली. देशभरातील खासदारांनी आपले मतदान केले. सायंकाळी 5 वाजता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सायंकाळी 6 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. काटेकोर सुरक्षा व्यवस्था आणि पारदर्शक पद्धतीने पार पडलेल्या या प्रक्रियेचा निकाल सायंकाळी 7:30 वाजता राज्यसभेचे महासचिव आणि निवडणूक निर्णय अधिकारी पी. सी. मोदी यांनी ...
error: Content is protected !!