Wednesday, May 13

Tag: the unsatisfied

Pandit Pradeepji Mishra : ‘असंगाशी संग, तर जीवन होईल भंग’- पंडित प्रदीपजी मिश्रा -NNL

Pandit Pradeepji Mishra : ‘असंगाशी संग, तर जीवन होईल भंग’- पंडित प्रदीपजी मिश्रा -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| जीवनात संगत कुणाशी करायची, सोबती कोण आहे, कसा आहे याची जाणीव आपल्याला असली पाहिजे, असंगाशी संग करून आपले जीवन, आपले आयुष्य उध्वस्त होईल, अशी वर्तणूक करू नका, वाईटाची संगत सोडा, त्याचेही जीवन सुधारण्याचा प्रयत्न करा, तो ऐकत नसेल तर त्याचा त्याग करा, अन्यथा तुमचे जीवन अधोगतीच्या मार्गावर जाईल,असे आवाहन पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी शिवमहापुराण कथेच्या सातव्या आणि अखेरच्या दिवशी केले. लाखो भाविकांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी या कथावाचनाची अत्यंत भक्तीभावाने सांगता झाली. गुरुवारी शिवमहापुराण कथेच्या सातव्या दिवशी पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी शिवमहापुराण कथेचा महिमा, महात्म्य आणि शिवजींच्या साक्षात्काराची महती कथन केली.कलयुगात सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण करणारी कथा म्हणजे शिवमहापुराण कथा आहे. वाईटाची संगत वाईटच असते,ज्याप्रमाणे आपण अग्नीला स्पर्श केला, तिच्या जवळ गेलो तर आगीचा चटका बसतो...
error: Content is protected !!