Dr. Manohar Chaskar ; विद्यार्थ्यांचे यश हेच पालकांच्या कष्टाचे फलित -कुलगुरू डॉ. मनोहर चासकर – NNL
नांदेड| जगातल्या प्रत्येक आई-बाबांची इच्छा असते ती आपल्या पाल्यांचा सत्कार आपल्या डोळ्यांनी बघण्याची. तो सत्कार बघातांना आपल्या जीवनात केलेल्या कष्टाचे फलित मिळाल्यासारखे प्रत्येक मुला-मुलींच्या आई-वडिलांना वाटत असते. आई-वडील दिवसरात्र कष्ट घेवून मुला-मुलींना शिकवतात पण त्या कष्टाचे खरे फलित हे आपले पाल्य यशस्वी झाल्यावरच होते. म्हणून विद्यार्थ्यांचे किंवा मुला-मुलींचे यश हेच पालकांच्या कष्टांचे फलित असते. असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी वक्त केले.
ते आज दि. १४ ऑगस्ट रोजी विद्यापीठ प्रशासनाद्वारे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठ परिसरातील संकुलामधून जे विद्यार्थी ‘नेट’, ‘सेट’, ‘गेट’, जि-पॅट’, ‘यूपीएससी’, ‘एमपीएससी’ इत्यादी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत त्यांचा पालकासह कुलगुरू महोदयां...
