Hunger stricke : प्रधानमंत्री कृषी विकास योजनेतील लाभार्थ्यांना निधीपासून वंचित ठेवल्याचा गंभीर आरोप
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील पोटा सर्कलमधील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना पशुधन खरेदी करूनही अनुदानाची रक्कम न मिळाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. हिमायतनगर येथील संबंधित कृषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत शेतकरी आक्रमक झाले आहेत.
माहितीनुसार, तालुक्यातील कोरडवाहू क्षेत्रातील सुमारे ४५ लाभार्थ्यांची योजना मंजूर झाली होती. दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित जनावरांच्या बाजारातून अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पशुधन खरेदी करण्यात आले. मात्र त्यानंतर आजतागायत लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही.
लाभार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येकी सुमारे २५०० रुपयांपर्यंत रक्कम खर्च करून पशुधन खरेदी करण्यात आले. मात्र अनुदानासाठी वारंवार पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने दिली जात असून ...
