The need to take : लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज
नायगांव बा./नांदेड l देश व राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून सर्वसामान्य जनतेची होत असलेली पिळवणूक चिंतेची बाब असून लोकशाही संकटात आलेली असल्याने लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत माजी राज्यमंत्री डाॅ.माधवराव पाटील किन्हाळकर यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने नायगांवच्या अंबिका मंगल कार्यालयात आयोजित बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर,युवानेते शिरीष देशमुख गोरठेकर,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.प्रांजलीताई रावनगांवकर, जिल्हा सरचिटणीस प्रा.डि.बी.जांभरुणकर,जिल्हा उपाध्यक्ष सुभाष रावनगांवकर, जेष्ठ नागरिक आघाडी जिल्हाध्यक्ष इंजी.भोसीकर, विनायकराव शिंदे,गजानन पांपटवार,अल्पसंख्याकचे प्रा.मजरोद्दीन, ओबीसी सेलचे शिवकुमा...
