Wednesday, May 13

Tag: The Lok Adalat is moving under the initiative

The Lok Adalat is moving under the initiative ‘Nyaya Apna Dari’ : ‘न्याय आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत फिरते लोकअदालत -NNL

The Lok Adalat is moving under the initiative ‘Nyaya Apna Dari’ : ‘न्याय आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत फिरते लोकअदालत -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| ग्रामीण भागातील जनसामान्यांना न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचता यावे व ते न्यायापासून वंचित राहू नये याकरिता नांदेड जिल्हामध्ये ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेंतर्गत सोमवार 6 ते शुक्रवार 24 जानेवारी 2025 पर्यंत मोबाईल व्हॅनमधून फिरते लोकअदालत जिल्ह्यातील निवडक गावापर्यंत पोहोचणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकणाच्या अध्यक्षा सुरेखा कोसमकर यांच्या हस्ते जिल्हा न्यायालय नांदेड येथून सोमवार 6 जानेवारी रोजी मोबाईल व्हॅनच्या प्रवास कार्यक्रमास हिरवा झेंडा दाखवून कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी लोहा तालुक्यातील मौजे सुनेगाव व पुढे 7 जानेवारी रोजी कंधार तालुक्यातील पेठवडज, 8 जानेवारी रोजी मुखेड तालुक्यातील पांडुरणी, 9 जानेवारी रोजी देगलूर तालुक्यातील करडखेड, 10 जानेवारी रोजी नायगाव तालुक्यातील मांजरम, 13 जानेवारी रोजी बिलोली तालुक...
error: Content is protected !!