The independence of the judiciary ; न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित राहावे! – NNL
अलीकडेच भारतीय सरन्यायाधीश यांनी त्यांच्या सेवानिवृत्ती ची घोषणा केली त्यामुळे काही बाबींवर प्रकाश टाकणे अगत्याचे वाटते. त्यांनी सेवानिवृत्ती घ्यावी की त्यागपत्र द्यावे? यावर काही व्हिडिओ ऐकण्यात आले ज्यामध्ये त्यांनी राजीनामा द्यावा अशीही अपेक्षा काहींनी व्यक्त केली. हो, हे अगदी खरे आहे, न्यायमुर्तीनी राजीनामाच द्यायला हवा. भारतीय संविधानातील कलम 32 हे अतिशय महत्वाचे आहे. या कलमास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचे ‘हृदय’ आणि ‘आत्मा’ असे म्हटले होते. हे कलम म्हणजे न्यायव्यवस्था (र्क्षीवळलळरीू) होय. भारतीय लोकशाहीचा हा तिसरा आधारस्तंभ होय. संसदेने पारित केलेला एखादा कायदा हा संविधानातील तरतुदींची विसंगत नाही ना? याचा अर्थ लावण्याची जबाबदारी ही न्याय व्यवस्थेची आहे. असे काही घडले तर न्यायव्यवस्था र्‘ीीे र्ोीींीं’ (स्वतः होवून) होऊन याबाबत निर्णय देईल अशी तरतूद घटनेत आहे. अलीकडे भा...
