Saturday, May 30

Tag: the family will be given Rs 2 lakh assistance

Accident insurance : शेतमजुरांनाही मिळणार अपघात विमा संरक्षण; मृत्यू झाल्यास कुटुंबाला २ लाखांची मदत

Accident insurance : शेतमजुरांनाही मिळणार अपघात विमा संरक्षण; मृत्यू झाल्यास कुटुंबाला २ लाखांची मदत

नांदेड, राजकीय
मुंबई/हदगांव/हिमायतनगर | राज्यातील शेतमजूर कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्य सरकारने आता शेतमजुरांनाही अपघात विमा संरक्षण देण्याची घोषणा केली आहे. शेती काम करताना अपघातात मृत्यू झाल्यास संबंधित शेतमजुराच्या कुटुंबाला २ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा महायुती सरकारने मार्च २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे. राज्यात शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या धर्तीवर ही मदत शेतमजुरांनाही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतमजूर कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी शेतमजुरांनाही अपघात विमा संरक्षण मिळावे, ही मागणी सातत्याने शासनदरबारी लावून धरली होती. नागपूर येथे २०२५ मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी...
error: Content is protected !!