Sands Carried ; महाकालच्या डोक्यावर सायफळच्या वाळू भक्तांनी वाहिले बेलपत्र .!
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। माहूर येथील रेती तस्करांचे सुरेख किस्से नवीन नाहीत. पैनगंगा नदीवरील वाळू तस्करी थांबविण्यासाठी महसूल विभाग देखावा करीत असला तरी वाळू चोरट्यांसोबत त्यांचे मधुर संबंध आता लपून राहिलेले नाही. डीलिंग फिस्कटल्यावर कारवाईचे काही प्रकरण समोर येतात.परवाच महसूल विभागात महाकाल म्हणून मिरवणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्याला खुश करण्यासाठी विदर्भ सीमेवरील धनोडा येथे मांडवली झाल्याची चर्चा असून महाकाल च्या ही डोक्यावर महसूल विभागाचा खाजगी वाहन चालक उर्फ नंदी ने सायफळ वाल्यांचे बेलपत्र वाहील्याची चर्चा आहे.
माहूर तालुक्यात पैनगंगा नदी वळसा घालून वाहते.या ठिकाणी अवैध वाळू तस्करी वाहतूक ही नित्याची बाब झाली आहे,त्यात वडसा, पडसा, सायफळ, टाकळी,हिंगणी बोंडगव्हाण, हडसणी,कुपटी,नेर,या वाळूपेंडाचा समावेश असून नुकतीच एका पत्रकाराला वाळू तस्करीचे चित्रीकरण करताना वाळू चोरट्यांकडून जीवे मारण्...
