Friday, June 26

Tag: The Confluence of Faith and Scripture

The Flower : रुचकीचे फूल : श्रद्धा आणि शास्त्र यांचा संगम

The Flower : रुचकीचे फूल : श्रद्धा आणि शास्त्र यांचा संगम

नांदेड, धार्मिक, फोटो गॅलरी
मारुतीराया आणि शनिदेवाला अर्पण केला जाणारा पान-फुलांचा हार म्हणजे रुचकी. ग्रामीण श्रद्धेत पवित्र मानली गेलेली ही वनस्पती केवळ धार्मिकच नव्हे, तर बॉटनिकलदृष्ट्याही वैशिष्ट्यपूर्ण आहे. रुचकीचे शास्त्रीय (बॉटनिकल) नाव Calotropis असून प्रामुख्यानेसया नावात ग्रीक मूळ शब्दांचा प्रभाव दिसतो या वंशातील वनस्पतींच्या फुलांची रचना, मुकुटासारखी (crown-like corona) पाकळी आणि दुधाळ रस (latex) हे ठळक वैशिष्ट्य. रुचकीच्या पानांत आणि देठात दुधाळ चिकट रस असतो—हा रस औषधी गुणधर्मांसाठी ओळखला जातो, पण थेट वापर टाळला जातो. करड्या-हिरव्या जाड पानांवर उमलणारी पांढरी-जांभळी छटा असलेली फुले सकाळच्या प्रकाशात अधिकच उठून दिसतात. याच सौंदर्यामुळे आणि टिकाऊपणामुळे देवपूजेत रुचकीचा हार मानाने अर्पण केला जातो. श्रद्धा सांगते—रुचकीची वनस्पती उष्णता, कोरडेपणा आणि प्रतिकूल परिस्थितीतही तग धरते; म्हणूनच शनिदेवाशी आण...
error: Content is protected !!