Friday, June 26

Tag: The Camp Fiasco

The Camp Fiasco : बिलोलीच्या रामतीर्थ येथील महसूल समाधान शिबिराचा फज्जा

The Camp Fiasco : बिलोलीच्या रामतीर्थ येथील महसूल समाधान शिबिराचा फज्जा

नांदेड, महाराष्ट्र
बिलोली/नांदेड, गोविंद मुंडकर| रामतीर्थ मंडळ येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान अंतर्गत शनिवार दि. १४ मार्च रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नांदेड विद्यालयात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र शिबिर सुरू होताच अनेक विभागांचे अधिकारी गैरहजर असल्याचे समोर आल्याने या शिबिराचा चांगलाच फज्जा उडाला. शिबिराच्या सुरुवातीलाच विडुल माने यांनी सर्व २६ विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती तपासण्याची मागणी केली. त्यानुसार एकेका अधिकाऱ्यांची हजेरी घेतली असता अनेक अधिकारी गैरहजर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे उपस्थित नागरिकांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत आणि शिबिराचा उद्देशच फोल ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. शासन आपल्या दारी या संकल्पनेतून नागरिकांच्या समस्या त्यांच्या दारी सोडवण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या...
error: Content is protected !!