Sunday, May 31

Tag: the brave soldiers of Pulwama

Soldiers salutes : पुलवामाच्या शूरवीरांना नांदेडची सलामी

Soldiers salutes : पुलवामाच्या शूरवीरांना नांदेडची सलामी

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| Pulwama attack येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या ४० सीआरपीएफ जवानांना नांदेडकरांनी कृतज्ञतेने अभिवादन केले. हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त माजी मंत्री D. P. Sawant यांच्या उपस्थितीत पॅरामिलिटरी संघटनेतर्फे शहरात भव्य बाईक रॅली काढण्यात आली. शनिवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.१५ वाजता शहरातील तिरंगा चौक येथील शहीद स्मारकापासून रॅलीला सुरुवात झाली. विविध प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत ही रॅली आय.टी.आय. परिसरातील Mahatma Phule स्मारकापर्यंत पोहोचली. सहभागींच्या हातात तिरंगा, घोषणांनी दुमदुमलेले वातावरण आणि देशभक्तीच्या जयघोषामुळे परिसर राष्ट्रप्रेमाने भारावून गेला होता. या रॅलीत पॅरामिलिटरी संघटनेचे अध्यक्ष सुनील लोणे, उपाध्यक्ष जनार्धन शेजुळे, पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महात्मा फुले व Savitribai...
error: Content is protected !!