Saturday, June 27

Tag: The birthday of a calf born on the day of the installation

Calf Birthday : अयोध्येतील श्रीराम मूर्ती स्थापनेच्या दिवशी जन्मलेल्या गोऱ्याचा बिलोलीत वाढदिवस उत्साहात साजरा

Calf Birthday : अयोध्येतील श्रीराम मूर्ती स्थापनेच्या दिवशी जन्मलेल्या गोऱ्याचा बिलोलीत वाढदिवस उत्साहात साजरा

नांदेड, कृषी
बिलोली, गोविंद मुंडकर| अयोध्या येथे भगवान श्रीराम यांच्या मूर्ती स्थापनेच्या ऐतिहासिक दिवशी जन्मलेल्या गोऱ्याचा (गाईच्या पुरुष जातीचे पिल्लू) वाढदिवस दि. २२ जानेवारी रोजी बिलोली तालुक्यात मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीराम जन्मभूमी मंदिरात मूर्ती स्थापनेचा मंगल प्रसंग आणि याच दिवशी या गोऱ्याचा जन्म झाल्याने या गोऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या गोऱ्याच्या वाढदिवसानिमित्त परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. शेतकरी कुटुंबीयांनी गोऱ्याची विधीवत पूजा करून त्यास हार, फुले अर्पण केली. काही ठिकाणी गूळ, चारा आणि फळांचा नैवेद्यही अर्पण करण्यात आला. गोसेवा हीच रामसेवा मानली जात असल्याने या उपक्रमाला धार्मिक तसेच सामाजिक स्वरूप प्राप्त झाले. अयोध्या येथे भगवान श्री राम मुर्ती स्थापनेच्या दिवशी जन्मलेल्या गो-याचा दि.२२ जानेवारी रोजी वाढदिवस साजरा करण्यात...
error: Content is protected !!