Saturday, June 27

Tag: The attack on the husband of the candidate

Nanded Crime : नांदेडमधील उमेदवाराच्या पतीवरील हल्ला राजकीय नसून दरोड्याचा प्रकार

Nanded Crime : नांदेडमधील उमेदवाराच्या पतीवरील हल्ला राजकीय नसून दरोड्याचा प्रकार

नांदेड, क्राईम
नांदेड, विशेष प्रतिनिधी| नांदेड शहरात उमेदवाराच्या पतीवर झालेला हल्ला हा राजकीय कारणातून झाल्याची चर्चा असताना, पोलीस तपासात सदर घटना राजकीय नसून, दरोड्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड व भाग्यनगर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईत अवघ्या 12 तासांत गुन्हा उघडकीस आणत सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचा त्यात समावेश आहे. या प्रकरणी पोलीस ठाणे भाग्यनगर, नांदेड येथे गुन्हा क्रमांक 29/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 189(2), 191(2), 191(3), 190, 351(3) तसेच 4/25 भारतीय हत्यार कायदा व 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी शिवाजी गणपत भालेराव (रा. बेलानगर, तरोडा बु., नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 13 जानेवारी 2026 रोजी रात्री साडेसातच्या सुमारास ते मित्राच्या घरासमोर...
error: Content is protected !!