Sunday, May 31

Tag: that imparts good values ​​to students

School’s : शाळा ही विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देणारे क्षेत्र व्हावे – मुंडकर

School’s : शाळा ही विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देणारे क्षेत्र व्हावे – मुंडकर

करियर, नांदेड
बिलोली| सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात मुलांना केवळ शैक्षणिक यश नव्हे, तर उत्तम संस्कार मिळणेही तितकेच आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शाळेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून शाळा ही विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देणारे क्षेत्र व्हावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव मुंडकर यांनी केले. ते बिलोली येथील सरस्वती प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. मुंडकर पुढे म्हणाले की, “आपला मुलगा किंवा मुलगी चांगल्या मार्गाने जावी, त्यांना चांगले संस्कार लाभावेत यासाठी आई-वडील नेहमीच प्रयत्नशील असतात. मात्र मुलांना चांगले संस्कार देणे ही केवळ पालकांचीच जबाबदारी नसून शाळांचीही तेवढीच जबाबदारी आहे. शिक्षणासोबतच मूल्यशिक्षण दिल्यास विद्यार्थी जीवनात नक्कीच यशस्वी ठरतात.” विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले...
error: Content is protected !!