Gorasena| …..तर बंजारा समाजाच्या भरवशावर निवडूण जाणार्या ६२ आमदारांना घरचा रास्ता दाखवणार -गोरसेना – NNL
हिमायतनगर| गोरबंजारा समाजावर प्राप्त आरक्षण वाचवण्याचे संकट असून, समाजातील नव्हे तर बंजारा समाजाच्या मतावर निवडूण येणारे एकही आमदार मंत्री विधीमंडळात तोंड उघडत नाही. तेव्हा फक्त निवडणूकीत गोरबंजारा समाजाचा केवळ मतासाठी वापर करणार्या नेता पुढार्याना येत्या विधानसभेच्या निवडणूकीत जोरदार धडा शिकवून चारी मुंड्या चित करु असा इशारा गोरसेनेने दिला आहे.
विमुक्त जाती अ मध्ये राजपूत भामटा या अत्यल्प लोकसंख्या असलेल्या जातीचा सामावेश असून नाम साधर्म्याचा फायदा घेत सवर्ण राजपूत, मिना, छप्परबंद या खुल्या प्रवर्गातील जनसमुदाय यांनी खुलेआम घुसखोरी करीत अभियांत्रिकी, वैद्यकीय, सह शासकीय नोकरभरतीत लाभ घेत आहे. राजपूत जातीतील लोक भामटा शब्द लावून भामटेगिरी करत असल्याने मुळ विमुक्त जाती अ प्रवर्गातील १४ तत्सम जाती आरक्षणाचे अतोनात नुकसान होत आहे. म्हणून गोरसेना या संघटनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात 2019 पा...
