Ghazalayan ; सुधाताई नरवाडकर यांच्या ‘ गझलायण ‘ पुस्तकाचे थाटात प्रकाशन
नांदेड l गझलकारा सुधाताई नरवाडकर यांच्या प्रत्येक गझलेत विचारांची खोली आहे. मराठी भाषेवरील त्यांचे प्रेम व प्रभुत्व त्यांच्या दिलेल्या गझलेमध्ये जागोजागी जाणवते. अखिल मानव जातीबद्दल त्यांच्या मनात कळवळा आहे आणि त्यांचे गझलेवर नितांत प्रेम आहे. गझलेसाठी जणू त्या वेड्या झालेल्या आहेत. गझलेचे वेडं माणसाला आयुष्यात उभे करते.
तसेच कुटुंबाला सावरण्याची ऊर्जा देते. अध्यात्म, हळुवार प्रेम, सामाजिक बांधिलकी, स्त्रीजीवन, स्त्री जीवनाचे विविध कंगोरे, विविध नाती, त्यामधील ताणतणाव, विद्यार्थ्याप्रती असणारा जिव्हाळा, निसर्गाची ओढ, देशभक्ती, मानवतेची सर्व मूल्ये त्यांच्या गझलेमध्ये आढळतात, असे मत कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध गझलकार अभियंता प्रवीण पुजारी यांनी व्यक्त केले.
जुन्या पिढीतील ज्येष्ठ साहित्यिक बी. रघुनाथ यांच्या कन्या तथा मराठवाड्यातील गझलकारा श्रीमती सुधाताई नरवाडकर यांच्या ' गझलायण ' या ...
