Bhimrao Keram ; आ.भीमराव केराम यांच्या पाठपुराव्याला यश
किनवट, परमेश्वर पेशवे l मागासवर्गीय मुला मुलींच्या निवासी शासकीय वसतिगृहासाठी किनवट विधानसभेचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून 100 विद्यार्थी क्षमतेच्या 2 शासकीय वस्तीगृहाला मंजुरी दिल्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.संजय शिरसाट यांचे पत्र आ. केराम यांना प्राप्त झाले आहे.या वस्तीग्रहामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा निवासी शिक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याने पालकवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
किनवट तालुका हा मागास दुर्गम असून येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. परंतु त्यांच्यासाठी वस्तीगृहाची सोय नसल्यामुळे प्रचंड शैक्षणिक गैरसोय होत होती.
वस्तीगृहाअभावी खेड्यापाड्यातील हजारो मागासवर्गीय विद्यार्थी शहराच्या ठिकाणी किरायाची खोली घेऊन अथवा ये जा करून शिक्षण घेतात.या संदर्भात आमदार भीमराव केराम यांनी राज्याचे मुख्यमंत...
