Thursday, May 28

Tag: Struggle Committee

Railway Struggle Committee: लातूर रोड–मुखेड–बिलोली–बोधन रेल्वे संघर्ष समितीची कार्यकारणी जाहीर

Railway Struggle Committee: लातूर रोड–मुखेड–बिलोली–बोधन रेल्वे संघर्ष समितीची कार्यकारणी जाहीर

नांदेड, महाराष्ट्र
मुखेड| लातूर रोड–मुखेड–बिलोली–बोधन या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या रेल्वे संघर्ष समितीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते दिलीप श्रीराम कोडगिरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ही निवड मुखेड येथील शासकीय विश्रामगृहात दिनांक १७ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या बैठकीत करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष बाबू सावकार देबडवार हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून अरुण शेठ महाजन यांची होती. बैठकीत रेल्वे मार्गाच्या प्रश्नावर सखोल चर्चा करण्यात आली व पुढील लढ्याची दिशा निश्चित करण्यात आली. दरम्यान, समितीच्या प्रमुख मार्गदर्शकपदी अरुण शेठ महाजन, डॉ. माधवराव पाटील उच्चेकर, मल्लिकार्जुन एकाळे, बालाजी बंडे, विठ्ठलराव इंगळे हे राहतील तर तसेच सल्लागार म्हणून अॅड. सुनील पौळकर, डॉ. श्रावण रॅपनव...
protest by the Farmer : मुखेडमध्ये शेतकरी पुत्र संघर्ष समितीकडून सोमवारी भव्य रास्ता रोको आंदोलन

protest by the Farmer : मुखेडमध्ये शेतकरी पुत्र संघर्ष समितीकडून सोमवारी भव्य रास्ता रोको आंदोलन

कृषी, नांदेड
नांदेड (प्रतिनिधी) जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी पुत्र संघर्ष समितीकडून सोमवारी (दि. 06 ऑक्टोबर 2025) सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, तहसील कार्यालयासमोर भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. अतिवृष्टी व भीषण पुरामुळे मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेती उध्वस्त होऊन शेतकरी पूर्णतः खचला आहे. शासनाने केवळ हेक्टरी 8,500 रुपयांची मदत जाहीर केली असून, ही मदत अपुरी असल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन पुढील प्रमुख मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना सरसकट विना अट संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी. पंजाब राज्याप्रमाणे हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत देण्यात यावी. सर्व शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा मंजूर करण्यात यावा. पूरग्रस्त गावांचे माळीणच्या धर्तीवर पुनर्वसन व...
error: Content is protected !!