Sepkatakarau Competition : राज्यस्तरीय शालेय सेपकटाकरॉ स्पर्धा उत्साहात संपन्न -NNL
नांदेड| जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने व नांदेड जिल्हा सेपकटाकरॉ असोसिएशन यांचे सहकार्याने सुरु असलेल्या राज्यस्तरीय शालेय सेपकटाकरॉ (14 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धा 3 ते 5 डिसेंबर, 2024 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथे संपन्न झाली.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे हे तर प्रमुख अतिथी म्हणुन तालुका क्रीडा संयोजक, नायगांव तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक जीवन पवार, क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडेकर, निवड समिती सदस्य गणेश माळवे, निवड समिती सदस्य दर्शन हस्ती, निवड समिती सदस्य रवीकुमार बकवाड, क्रीडा शिक्षक विनोद जमदाडे आदी उपस्थित होते. या स्पर्धेत पुणे व नाशिक विभागाचे वर्चस्व राहीले असून स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे आहे. 14 वर्षे मुले- प्रथम- पुणे विभाग, द्विती...
