Nanded ; ऑलिंपिक मशाल रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद भारत माता की जय सह अनेक घोषणांनी नांदेडात क्रीडामय वातावरण
नांदेड l जिल्हा क्रीडा कार्यालय, नांदेड वाघाळा शहर महापालिका व ऑलम्पिक असोसिएशन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ जून रोजी जुना मोंढा ते जिल्हा क्रीडा कार्यालय गोकुळ नगर नांदेड यादरम्यान ऑलम्पिक मशाल रॅली काढण्यात आली होती. याप्रसंगी क्रीडा प्रशिक्षक, खेळाडू मोठ्या प्रमाणात या मशाल रॅलीस सहभागी झाले होते. नांदेड भूषण संत बाबा बलविंदरसिंगजी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवत या ऑलम्पिक मशाल रॅलीस प्रारंभ करण्यात आला.
जुना मोंढा येथे सकाळी ८ वाजता आयोजित ऑलम्पिक मशाल रॅली उद्घाटन प्रसंगी नांदेड ऑलम्पिक संघटनेचे चेअरमन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जनार्दन गोपीले, कार्याध्यक्ष प्रलोभ कुलकर्णी, ज्येष्ठ क्रीडा संघटक डॉ. हंसराज वैद्य, डॉक्टर दीपक बच्चेवार ,अध्यक्ष जसविंदरसिंघ रामगडिया, सचिव डॉ राहुल वाघमारे , जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा अधिकारी बालाजी शिरशीकर,संजय बेतेवार, उपाध्यक्ष बाल...
