Former MLA Pradeep Naik : गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन त्वरीत नुकसान भरपाई द्यावी – माजी आमदार प्रदीप नाईक -NNL
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार व अतिवृष्टीने धो-धो पाऊस पडत असल्यामुळे शेतीतील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी आज दिनांक 4 रोजी किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ दयाळधानोरा, शिवनी, झळकवाडी , तल्लारी कुपटी ,कोसमेट, मुळझरा,कोल्हारी, इस्लापूर, भिशी, या गावांमध्ये थेट शेतीच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी केली.
त्याच बरोबर कापुस, सोयाबिन, उडीद, ज्वारी, तुर या पिकांची व घर, गाई, गोठे, पशुधनाची जिवित हाणी झाली आहे. तालुक्यातील सर्व महसुल मंडळ निहाय तलाठी व ग्रामसेवक यांना पंचनामा करण्याकरीता आदेश काढण्यात यावा पिक नुकसानहीसह इतर सर्व नुकसानीची भरपाई देण्यात यावी तथापि विना विलंब सरसकट तालुक्यात झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीचा हेक्टरी ५०,०००/- रुपये मोबदला शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँ...
