Friday, June 26

Tag: Shaheedi Samagam

Arogy : शहीदी समागमात भाविकांच्या आरोग्याची चोख व्यवस्था

Arogy : शहीदी समागमात भाविकांच्या आरोग्याची चोख व्यवस्था

नांदेड, आरोग्य
नांदेड| शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्यानिमित्त नांदेडच्या मोदी मैदानावर केवळ धार्मिकच नव्हे तर व्यापक जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत आहेत. लाखो भाविकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभाग व मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, याला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात २५० हून अधिक तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तैनात असून, भाविकांना मोफत आरोग्य तपासणी, सल्ला व औषधोपचार दिले जात आहेत. मोदी मैदान परिसरात १२ सुसज्ज वैद्यकीय दालने, दोन ओपीडी व पाच खाटांचे तात्पुरते रुग्णालय उभारण्यात आले आहे. हाडांचे विकार, नेत्ररोग, मधुमेह, हृदयरोग, स्त्रीरोग, क्षयरोग तसेच असंसर्गजन्य आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे एंडोस्कोपी तपासणी व कर्करोग स्क्रिनिं...
error: Content is protected !!