Dr. Hansraj Vaidya ; ज्येष्ठ नांदेड भूषण डाॅ.हंसराज वैद्य “हेल्थ केअर एक्सलन्स अवार्डने” सन्मानित
नांदेड l नांदेड येथील भाग्यनगर-आनंद नगर रोडवरच्या ग्रँड तुलसी हाॅॅॅटेल मध्ये नुक्त्याच एका भव्य दिव्य कार्यक्रमात माय एफ एम समूह व प्रझेंटिंग स्पाॅन्सार मंथन इन्फ्राकेयरचे मा.पंकज शर्माजी व सौ.शर्माजी,असोशियट स्पाॅन्सार म्हणून नारायणी गर्ल्स होस्टेलचे मा.तेजस हळदे पाटील, आणि आॅटोमोबाईल्सचे पार्टणर राजयोग टाॅयाटोचे मा.व्यंकटेश पुदुचेत्ती या दिग्गजांच्या वतीने नांदेड शहरातील आरोग्य क्षेत्रात सातत्याने, सचोटिने, निस्प्रूह भावनेने तथा मानुस्कीच्या दृष्टीकोणातून समाजाच्या तळागाळातील सामान्य जनतेसाठी ज्यांनीं ज्यांनी , सामाज ऋण फेडण्याचे प्रयत्न केलेले आहेत,करत आहेत अशा वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित तपस्वींचा गुणीजनांचा शोध घेऊन अनेकांना गौरविण्यात आले!
त्यात वैद्यकीय, शैक्षणिक, साहित्यिक,सांस्कृतिक, सामाजिक,कृषी,क्रिडा,संगित, गरजवंत ज्येष्ठ नागरिक उत्थान आदि क्षेत्रात सतत कार्यरत असणारे कोरो...
