माहूरचे ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे यांना दैनिक समीक्षा कर्तुत्व पुरस्कार जाहीर
श्रीक्षेत्र माहूर l माहूर येथील ज्येष्ठ व सातत्याने लिखाण करणारे पत्रकार वसंत कपाटे यांची दैनिक समीक्षा कर्तुत्व पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्काराचे वितरण दि. ५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता नांदेड येथील मिनी सह्याद्री सभागृहात मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे, अशी माहिती मुख्य संयोजक तथा दैनिक समीक्षा चे मुख्य संपादक रुपेश पाडमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
मीमांसा फाउंडेशन, दैनिक समीक्षा, मंथन क्रिएटिव्ह ग्रुप, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व पत्रकार प्रेस परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत असलेल्या पत्रकार व मान्यवरांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात येतो. पत्रकारितेतील निष्ठा, सातत्य, सामाजिक भान आणि जनहितासाठी केलेल्या कार्याला प्रोत्साहन मिळावे, तसेच नव्या पिढीतील पत्रकारांना प्रेरणा मिळावी, ...
