राज्यात महाविकास आघाडीचेच सरकारी येईल : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. चंद्रकांत हंडोरे यांचा विश्वास -NNL
नांदेड। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रात झालेला पराभव आणि महाविकास आघाडीला मिळालेले यश हे निश्चितपणे आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करणारे ठरेल . महाविकास आघाडी राज्यात 170 हून अधिक जागा जिंकेल असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी काल नांदेडमध्ये माध्यमांशी बोलताना व्यक्त केला . एका खाजगी कामानिमित्त हंडोरे नांदेड येथे आले असता ते माध्यम प्रतिनिधीशी बोलत होते .
यावेळी भीमशक्तीचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर दिनेश निखाते , सुरेश हटकर संजय कवठेकर, शत्रुघ्न वाघमारे , प्रकाश दिपके , मिलिंद लोकरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. मध्यमशी संवाद साधताना खा. हंडोरे म्हणाले की , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपकी बार चार सौ पार चा नारा देण्यात आला होता. चार सो पारचा नारा द...
