Collector Abhijit Raut | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लेखी अर्जाची छाननी करून ठेवा : जिल्हाधिकारी – NNL
नांदेड| मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेला नांदेड शहर व नांदेड ग्रामीण भागात भरपूर प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाइन अर्ज ऐवजी ऑफलाइन अर्जाकडे नागरिकांचा कल असून आलेले सर्व अर्ज तालुकास्तरीय समिती पुढे छाननीला जाण्यापूर्वी वर्गीकृत करण्याचे निर्देश आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संपूर्ण यंत्रणेला दिले आहे.
नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी आज घेतलेल्या संयुक्त बैठकीमध्ये त्यांनी जिल्ह्यातील सर्व महसूल व जिल्हा परिषद यंत्रणेला या संदर्भात छाननी करण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यामध्ये तालुकास्तरीय छाननी समित्या गठीत होत आहेत. एकदा समित्यांची काम सुरू झाले की त्यांच्यापुढे जाताना आधीच अर्ज वर्गीकृत असले पाहिजेत. जिल्ह्यातील सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा हे अंतिम ध्येय आहे. त्यामुळे आलेला प्रत्येक अर्...
