प्रत्येक स्टॉलवर लोकराज्य अंक उपलब्ध विद्यार्थी, अभ्यासक व शाळांनी मागणी करावी -NNL
नांदेड| राज्य शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य हे शासकीय योजना व महत्वाची माहिती देणारे मासिक आहे. स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त असलेले लोकराज्य नव्या जोमाने प्रसिध्द होणार असून प्रत्येक विद्यार्थ्यांनी, अभ्यासक, लेखक व सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी आपला अंक राखून ठेवावा , असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केले आहे.
आज पहाटे नांदेड जिल्ह्यातील वृत्तपत्र वितरण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष तथा नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष बालाजी पवार, राज्य संघटनेचे कार्यकारी सदस्य चंद्रकांत घाटोळ, उपाध्यक्ष गणेश वडगावकर, कोषाध्यक्ष बाबू जल्देवार सह पदाधिकारी व वृत्तपत्र विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकराज्यचा अंक प्रत्येक स्टॉलवर उपलब्ध केल्यास विद्यार्थ्यांना सहज खरेदी करणे शक्य ...
