सरदार 150 युनिटी मार्च पदयात्रा उत्साहात संपन्न
नांदेड l मेरा युवा भारत केंद्र, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता द्वितीय पदयात्रा आणि विकसित भारत पदयात्रा 11 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे उत्साहात संपन्न झाली.
सकाळी 8 वाजता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. मारोती गायकवाड, आयटीआयच्या उपप्राचार्या श्रीमती कविता दासवाड, सायन्स कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ. अरुणा शुक्ला, सिडको इंदिरा कॉलेजच्या डॉ. भागवत पास्तापुरे, मोहन कलबरकर आणि गोडबोले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून पदयात्रेला प्रारंभ झाला.
पदयात्रेत सहभागी युवक-युवतींनी हातात तिरंगा घेऊन “एक भारत, आत्मनिर्भर भारत”, “वंदे मा...
