Santhosh Pandagale appointed : जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष पांडागळे यांची नियुक्ती -NNL
मुंबई| मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विद्यमान कार्याध्यक्ष, दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठी पत्रकार परिषदेने एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे बिनविरोध निवडीची घोषणा केली आहे.
दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते. गेल्या जिल्हा मराठी पत्रकार संघ कार्यकारिणीची मुदत संपल्यानंतर नूतन अध्यक्ष निवडीसाठी परिषदेचे निरिक्षक, सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे यांनी दोन वेळा नांदेडला भेट देऊन सर्व वरिष्ठ पदाधिकारी तसेच सदस्यांशी चर्चा केली आहे.वार्ताहर ते कार्यकारी संपादक असा पत्रकारितेतील प्रवास असलेल्या संतोष पांडागळे यांची नियुक्ती .मराठी पत्रकार परिषदेने केली आहे.
अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊन परिषदेशी विचारविनिमय करून आपली क...
