Poor quality work : सिरंजनी–पळसपूर सिमेंट रस्त्याच्या कामात धांदल! निकृष्ट दर्जाचे काम, अभियंता–ठेकेदार मिलीभगत उघड
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील सिरंजणी येथून पळसपूरकडे जाणाऱ्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता, अंदाजपत्रकाला बगल आणि निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी या कामाच्या तक्रारींमुळे काम बंद ठेवण्यात आले (Siranjani-Palaspur Cement Road work rigged! Poor quality work) होते. मात्र संबंधित अभियंता व ठेकेदाराने मिलीभगत करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत पुन्हा काम सुरू केले असून, केवळ दिखाव्यासाठी काही भागावर थातुरमातुर काँक्रीट टाकून काम पूर्ण करण्याचा सपाटा सुरू केला आहे.
तक्रारदार धम्मपाल मुनेश्वर यांनी या संदर्भात थेट संबंधित अभियंत्याला दूरध्वनीवर संपर्क साधून रस्त्याच्या गुणवत्तेबाबत चौकशी केली असता, अभियंत्याने उडवा-उडवीची उत्तरे देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे मुनेश्वर यांनी सांगितले. एवढेच नव्हे,...
