Revised Crop Insurance Scheme : खरीप 2025 साठी सुधारित पीक विमा योजना – विनयकुमार आवटे
Revised Crop Insurance Scheme for Kharif 2025 - Vinay Kumar Awate विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणा-या नुकसानीपासून शेतकऱ्यांस आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची ठळक वैशिष्टे
खरीप हंगाम विमा योजनेत भाग घेता येणारी पिके - भात (धान), खरीप ज्वारी , बाजरी, नाचणी(रागी), मका, तूर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, तीळ, कारळे, कापूस व कांदा या अधिसूचित पिकांसाठी ,अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येईल.
महत्वाच्या बाबी - योजनेत सहभागासाठी अंतीम मुदत दि. ३१ जुलै २०२५, या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याचा agristack नोंदणी क्रमांक आणि ई पीक पाहणी बंधनकारक आहे., अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके सर्व शेतकरी या योजनेत भाग घेऊ शकतात., कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक आह...
