Nagar Panchayat : हिमायतनगर नगरपंचायतीकडून नागरिकांच्या मागणीला त्वरित प्रतिसाद
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर नगरपंचायतीने नागरिकांनी सोशल मीडियावर केलेल्या तक्रारीची तत्काळ दखल घेतली. उमरखेड रोडवरील अमोल मेडिकल आणि परमेश्वर बसस्थानक परिसरातील घाण सकाळी ९ वाजता स्वच्छता विभागाच्या वाहन व कर्मचाऱ्यांमार्फत उचलली आहे.
नगरपंचायतीचे स्वच्छता विभाग प्रमुख श्री. बोकारे यांनी सांगितले की, शहरातील मुख्य चौकात घाण होणार नाही यासाठी शहरातील सर्व नागरिकांनी देखील सहकार्य करणे गरजचे आहे. नागरिकांनी वारंवार रस्त्यावर घाण न टाकता ती एका डब्यात किंवा बकेटमध्ये जमा करून नगरपंचायतीच्या वाहनातच टाकावी. असे केल्याने रस्त्यावर घाण व दुर्गंधी पसरणार नाही आणि शहर अधिक स्वच्छ व सुंदर राहील.
घरामध्ये केरकचरा जमा करताना नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा जमा करून नगरपंचायतीच्या वाहनात टाकल्यास शहर नीटनेटके होण्यास आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यास मोठी मदत होईल. स्वच्छ शहर...
