Sunday, June 28

Tag: Resolve pending waqf cases immediately

Pending waqf Cases : प्रलंबित वक्फ प्रकरणे तात्काळ निकाली काढा, अन्यथा चेअरमनांच्या घरांवर तीव्र आंदोलन – शब्बीर अन्सारी यांचा इशारा

Pending waqf Cases : प्रलंबित वक्फ प्रकरणे तात्काळ निकाली काढा, अन्यथा चेअरमनांच्या घरांवर तीव्र आंदोलन – शब्बीर अन्सारी यांचा इशारा

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| तहरीक-ए-औकाफच्या वतीने वक्फ बोर्डाकडे ५४ प्रलंबित प्रकरणांचे निवेदन देण्यात आले होते. त्यातील सात प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्याचे आश्वासन मिळूनही तब्बल सहा महिने उलटले आहेत. दुर्दैवाने एका प्रकरणाचा अपवाद वगळता उर्वरित सर्व प्रकरणांवर अद्याप धुळफेक होत आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या ९ सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीत प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निकाल न लागल्यास वक्फ बोर्डाच्या सदस्यांच्या व चेअरमनांच्या घरांवर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तहरीक-ए-औकाफचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ ओबीसी नेते शब्बीर अन्सारी साहेब यांनी आज नांदेड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. नांदेड जिल्ह्यातील हजरत दुलेशाह रहेमान दर्गाह आणि बिलोलीतील ऐतिहासिक काला पत्थर मशीद हजरत नवाब सर्फराज खान सहाब मखबरा झुजागणं नगारखाना काब्रस्तान परिसरातील भूखंडांची प्रकरणे विशेष महत्त्वाची अस...
error: Content is protected !!