Gavthan site and having the ownership right certificate : गावठानच्या जागेवर वास्तव्य राहून मालकी हक्क प्रमाणपत्रापासन वंचित नागरिकांच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकारी याना निवेदन सादर -NNL
नांदेड/हिमायतनगर,अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात गेल्या ७० वर्षांपासून गावठानच्या जागेवर वास्तव्य करून ग्रामपंचायत व नगरपंचायतीला कर भरणाऱ्या गोर गरीब नागरिक नमुना नंबर ४३ मालकी हक्क प्रमाणपत्रापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र चालविले जात आहेत. परिणामी रहिवाश्याना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. विशेषतः प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाचा लाभ मिळण्यास देखील मोठी अडचण निर्माण झाली आहे. या समस्येला वैतागलेल्या नागरिकांनी महिनाभरापासून आंदोलनाचे हत्यार उपसले. मात्र ज्यांच्या मतावर आपण निवडून आलो अश्याच नागरिकांना न्याय मिळवून देण्यास आमदार महोदयांनी केवळ आश्वासन देण्याव्यतिरिक्त कोणतेही प्रयत्न केले नाही. केवळ आश्वासनाची खैरात देत कोपराला गूळ लावून ठेवलं जात असल्याचा आरोप करत वंचित नागरिकांच्या शिष्टमंडळाने थेट जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तहसीलदार अध्यक्ष असलेल्या श्री परमेश्...
