Saturday, June 27

Tag: regarding the suspicious death of a young girl

Himaytnagar news : लातूर नवोदय विद्यालयातील चिमुकलीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी हिमायतनगरात सोमवारी रास्ता रोको आंदोलण

Himaytnagar news : लातूर नवोदय विद्यालयातील चिमुकलीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी हिमायतनगरात सोमवारी रास्ता रोको आंदोलण

क्राईम, नांदेड, लातूर
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| लातूर नवोदय विद्यालयातील चिमुकलीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र एसआयटीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अन्यथा मातंग समाज तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड–किनवट राष्ट्रीय महामार्गावरील चौकात सोमवार, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ठीक १२ वाजता भव्य बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीत शिक्षण घेणाऱ्या मातंग समाजाच्या हुशार विद्यार्थिनी कुमारी अनुष्का हिचा मृत्यू आत्महत्या नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. विद्यालयातील वसतिगृहात पलंगाला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. मात्र हा मृत्यू अभ्यासाच्या तणावामुळे झाला की नियोजनबद्ध घातपात आहे, याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतेही स्पष्ट व लेखी उत्तर देण्यात आलेले नाही. या प्रकरण...
error: Content is protected !!