Rashtriya Swayamsevak Sangh : रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
मुंबई| रा.स्व. संघ हे उच्चवर्णीयांची संघटना आहे हा हेतूपुरस्सर पसरवलेला गैरसमज आपल्या पुस्तकातून दूर करताना संघ ही सर्वसमावेशक संघटना असल्याची वस्तुस्थिती रमेश पतंगे यांनी आपल्या पुस्तकातून अधोरेखित केली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.
लेखक व विचारवंत रमेश पतंगे लिखित 'व्हाय आर वी इन द आरएसएस?.... ' या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवन येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. पूर्वी संघासाठी कार्य करणाऱ्यांना शासनात पदे स्वीकारता येत नसत, असे सांगून आज देशाचे पंतप्रधान, अनेक राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
देशात भूकंप, नैसर्गिक आपदा व रेल्वे अपघात होतात त्यावेळी संघाचे स्वयंसेवक नेहमीच सेवा कार्यात अग्रेसर असतात, असे राज्यपालांनी सांगितले. उत्तर पूर्वेच्या ...
