रा .रं. बोराडे यांच्या ‘माझं गाव माझी माणसं’ कथासंग्रहाचे प्रकाशन -NNL
छत्रपती संभाजीनगर| सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या कोरोना काळातील ग्रामीण भागातील परिस्थितीचे दर्शन घडविणाऱ्या कथांचा 'माझं गाव माझी माणसं' या संग्रहाचा प्रकाशन समारंभ नुकताच संपन्न झाला.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी नामवंत प्रकाशक बाबा भांड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शंकर वाडेवाले व प्रा. गणेश मोहिते हे होते. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत इसाप प्रकाशनाचे प्रकाशक दत्ता डांगे यांनी केले. त्यांनी प्रास्ताविक करताना रा. रं. बोराडे गुरुजींचे साहित्य म्हणजे सुवर्णकण आहेत. ते हरवू न देता सारे एकत्र करून वाचकांच्या हाती दिले पाहिजेत असे विचार मांडले. यानंतर बाबा भांड यांच्या हस्ते 'माझं गाव माझी माणसं' या संग्रहाचे प्रकाशन झाले. यावेळी मनोगत व्यक्त करताना बोराडे गुरुजी यांनी आपण साहित्य अकादमीची सर्व पुस्तके वाचली आहेत. आता वयोमानानुसार वाचता येत नाही परंतु इतर...
