X -Ray mation : ग्रामीण रुग्णालयात अद्यावत एक्स रे मशीन द्या नवीन एक्स-रे मशीन सह आर्थोपेडिक सर्जन ची नियुक्ती करा
श्रीक्षेत्र माहूर l माहूर शहरातील ग्रामीण रुग्णालयात शासनाकडून बसविण्यात आलेली एक्स-रे मशीन जुनाट झाल्याने या मशीनमध्ये काढलेले फ्रॅक्चर किंवा इतर जखमा दिसत नसल्याने रुग्णांना खाजगी एक्स-रे सेंटरचा आधार घ्यावा लागत असून जास्त प्रमाणात फ्रॅक्चरअसल्यास पुसद यवतमाळ येथे जाऊन महागडे उपचार घ्यावे लागत असल्याने आर्थिक फटका बसत असून जिल्हा शल्य चिकित्सकांनी तात्काळ नवीन एक्सरे मशिन बसवून ऑर्थोपेडिक सर्जन ची नियुक्ती करून गोरगरीब रुग्णांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे
जुनाट एक्स-रे मशीन बनली शोभेची वस्तू रुग्णांना बसतोय आर्थिक फटका काढलेल्या एक्सरेत जखमा फ्रॅक्चर दिसत नसल्याने रुग्णांना खाजगी एक्स-रे सेंटरचा घ्यावा लागतो आधार
माहूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सध्या आर व्ही एक्स-रे मशीन असून ऑर्थोपेडिक सर्जन नाही महिनाभरात किमान 300 वर रुग्ण माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात एक्स-रे करण्यासा...
