Lokseva : लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत नागरिकांना वेळेत सेवा द्या – आयुक्त डॉ. किरण जाधव
नांदेड l नागरिकांना शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ विहित कालावधीत मिळावा यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लागू करण्यात आला आहे. या अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणी द्वारे नागरिकांना वेळेवर सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश छत्रपती संभाजीनगर येथील राज्य लोकसेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम-2015 अंतर्गत अधिसूचित सेवांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप मोळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्री. गिरी तसेच सर्व उपविभागीय अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.
आयुक...
