illegal sand mining : चिंचोली शिवारातील अवैध रेती उपसा कारवाई; २३.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
उस्माननगर, माणिक भिसे| लोहा तालुक्यातील चिंचोली शिवारातील गोदावरी नदीपात्रात विनापरवाना सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननावर उस्माननगर पोलिस व महसूल विभागाने मोठी कारवाई केली. कारवाई दरम्यान लोखंडी इंजिनांचे ५ संच आणि थर्माकॉलच्या १२ तराफ्यांसह एकूण २३,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला.
नांदेडचे पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ऑपरेशन फ्लश आऊट मोहिमेनुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले होते.
त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांच्या नेतृत्वाखालील पथक पट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीवर तातडीने कार्यरत झाले. चिंचोली शिवारात धाड टाकल्यावर नदीपात्रातून लोखंडी इंजिन व थर्माकॉल तराफ्यांच्या सहाय्याने रेती उपसा सुरू असल्याचे स्पष्ट झाले.
कारव...
