पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने अल्पकालीन रोजगारक्षम कार्यक्रमाचे उद्घाटन
श्रीक्षेत्र माहूर l हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माहूर येथे उद्योग- संरेखित आणि नवयुगीन अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभ प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते आभासी पद्धतीने दि 8 ऑक्टोंबर 2025 रोजी दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी उद्घाटन करण्यात आले. यावेळी प.पू.श्री. योगीबापू श्यामजी भारती महाराज तहसीलदार अभिजीत जगताप यांची उपस्थिती होती
यावेळी सपोउपनि बी एन जाधव माहूर आय एम सी सदस्य संजय सुरोशे, सतीश कान्नव युवा ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अनिल माडपेलीवार, जयकुमार अडकिने, सय्यद ईसा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनात नव्याने सुरू झालेल्या अभ्यासक्रमाबद्दल सविस्तर माहिती सांगितली, तुम्ही फक्त प्रमाणपत्रासाठी शिक्षण घेऊ नका तर एक सक्षम बना, तुमचे कौशल्य दाखवा यासाठीच शासनाने नवीन युवा पिढीला ए...
