वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; हिमायतनगर तालुक्यात वीज पडून म्हैस दगावली – NNL
नांदेड/हिमायतनगर,अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील कालपासून वातावरणात बदल झाला असून, काही भागांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असून, रब्बी हंगामातील उर्वरित पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात दुपारी ४४ अंश सेल्सिअस तापमान असल्याने प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवत होता. दरम्यान, बुधवारी सायंकाळी अचानकपणे विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावून नांदेड शहर व परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढलं. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. परंत्तू शहरात महानगरपालिकेच्या दुर्लक्षित कारभाराचे पितळे उघडे पडले असून, जिकडे तिकडे तळे साचल्याने नागरिकांना घाण पाण्यातून मार्ग काढावा लागला असल्य...
